नंदूरबार l प्रतिनिधी
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात जिल्हा पोलीस दलाची सोशल मीडियावर करडी नजर असून आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द् गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
19 ते दिनांक 28 सप्टेंबर 2023 दरम्यान गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे. सण / उत्सव काळात समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुद्दाम व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक इत्यादी सोशल मीडीयाच्या माध्यमातून खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून नागरिकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी खबरदारी म्हणुन जिल्हा पोलीस दलातील सोशल मीडिया सेल सक्रिय केलेला आहे.
सण / उत्सवादरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे काही समाज कंटकांकडून अनुचीत प्रकार होणार नाहीत. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच काही अनूचीत प्रकार आढळून आल्यास त्यांचेविरुध्द् कटोर कायेदशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.
सोशल मीडियाचा वापर करमणूक व ज्ञान मिळविण्यासाठी केला जात असतो. परंतु सोशल मीडियावरुन काही लोक सार्वजनिक शांतता भंग होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट, लेख लिहून खोडसाळपणा करतात. म्हणून सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजीक भान ठेवावे व कोणतीही पोस्ट सोशल मीडियावरुन (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप) प्रसारित करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? याबाबत खात्री करुन मगच ती प्रसारित करण्याची काळजी घ्यावी.
आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या इसमांविरुध्द् भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील तसेच सायबर सेल नंदुरबार यांच्याकडून वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत असते. सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना इशारा देण्यात येतो की, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये. तसेच कोणीही कायदा हातात घेवून सार्वजनिक शांतता भंग करु नये, तसे आढळून आल्यास संबंधीतांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक शपी. आर. पाटील यांनी दिला आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारित करण्याचे दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधवा असेही आवाहन करण्यात आले आहे.