नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन गणपती विसर्जनात पारंपारिक वाद्य बॅण्डवर बंदी घालुन समस्त हिंदू धर्मावर अन्याय करीत असून बंदी न उठवल्यास गणपती विसर्जन करणारा नाही असा इशारा नंदूरबार तालुक्यातील गणेश मंडळ, विविध पक्षातील नेते यांनी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात सर्वत्र गणेश उत्सव उत्साहात साजरा केला जात असतो. आजपर्यंत गणेश विसर्जणाच्या मिरवणूकीत पारंपारिक वाद्य बॅण्ड व ढोल ताशा, लावुन गणरायाचे विसर्जन केले जाते. आता संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच पार पडलेला दहीहंडी उत्सवात विविध पक्षाचे नेतेगण, मंत्री, लोकप्रतिनिधी, सेलेब्रिटीज देखील डी.जे. व पारंपारिक वाद्य बॅण्डच्या तालावर नृत्य करून आनंद घेतांना व हिंदू धर्माचा उत्साह वाढवताना दिसले.
संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्यापैकी नंदुरबार वगळता ३५ जिल्ह्यात सर्व हिंदू धर्माच्या सन उत्सवात, धार्मिक कार्यक्रमात पारंपारिक वाद्यबॅण्ड, डी.जे लाऊन आनंदात साजरी करतात त्या जिल्ह्यात कुठलाही प्रकारचा निर्बंध नसतांना फक्त नंदुरबार जिल्ह्यातच का पोलीस प्रशासन गणपती विसर्जनात पारंपारिक वाद्य बॅण्डवर बंदी घालुन समस्त हिंदू धर्मावर अन्याय करतात. नंदुरबार तालुक्यातील गरीब शेतकरी आयुष्यभर कष्टकरून राबराब राबुन आपल्या मुला मुलींचे लग्न मोठ्या थाटा माटात करण्यासाठी पैसा गोळा करून पारंपारिक वाद्य बॅण्ड लावत असतो आणि आपले पोलीस प्रशासन रात्री हळदीच्या व लग्नाच्या दिवशी जाऊन पारंपारिक वाद्य बॅण्ड जप्त करून त्याच्या आनंदात विरंजन घालण्याचे काम पोलीस प्रशासनाने आष्टे, दुधाळे व इतर परिसरात ह्या वर्षी केले आहे. साहेब ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो त्याच दिवशी आपले पोलीस प्रशासन पोलीस गाडी घेऊन शेतकर्याच्या घरी जाने योग्य आहे का? एकीकडे महाराष्ट्र शासन विविध योजनेतून बेरोजगार लोकांना बॅड साहित्ये वाटप करून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करते आणि नंदुरबार पोलीस प्रशासन पारंपारिक वाद्य बॅडवर निर्बंध घालते बॅण्ड वरील स्पीकर चालणार नाही फक्त भोंगे लावा,
संपूर्ण महाराष्ट्रात भोंगेवाले बॅण्ड बंद झाले आहेत. आता स्पीकरवालेच बॅण्ड पाहायला मिळतात आणि उपलब्ध होतात. एक प्रकारे पोलीस प्रशासन पारंपारिक वाद्य बॅड वाल्यांवर उपासमारीची वेळ आणतील कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णय नुसार विशिष्ट आवाज पर्यंत डी.जे. वाजवण्याची परवानगी असतांना व पारंपारिक वाद्य बॅडवर कुठलेही प्रकारचे निर्बंध नसतांना नंदुरबार पोलीस प्रशासन का म्हणून पूर्णपणे बंदी आणुन जन भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहे. या नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या दळपशाहीला बघून समस्थ हिंदू धर्मातील गणेश भक्तांना वाटायला लागले आहे कि आपण नंदुरबार मध्ये आहोत कि पाकिस्थानात आहोत. नंदुरबार तालुक्यातील खेड्या पाड्यात गणपती विसर्जनाच्या दिवसी पारंपारिक वाद्य बॅडवर विविध जाती धर्माच्या महिला भक्तगण लहान थोर मंडळी नाचुन श्रींचे विसर्जन करत असतात.
म्हणून आपण याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. गणेश उत्सव हा कोण्या जाती धर्माचा, पंथाचा पक्षाचा नसुन सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून पुर्वानुसार साजरा केला जातो. हे संपूर्ण महाराष्ट्र ज्ञात आहे.
तरी उपमुख्यमंत्री आपण हिंदू धर्माचा जन भावनेचा आदर करून आणि पारंपारिक वाद्य बॅण्ड, या वाद्यधारकांवर उपासमारीची वेळ येणार नाही याचा विचार करून व समस्त भक्तगण दुखावणार नाही याची दक्षता घेऊन त्वरित निर्बंध उठवण्याचे आदेश नंदुरबार पोलीस प्रशासनाला देऊन व सरसकट बॅण्ड वाद्याला परवानगी देऊन गणेश भक्तांच्या आनंदात आपणही सहभागी व्हावे व आम्ही ही पोलीस प्रशासनाला सर्व गणेश मंडळाच्यावतीने सहकार्य करू व आपल्या पोलीस प्रशासणाने गणपती विसार्जाच्या दिवशी कोणत्याही मंडळाचा बॅण्ड बंद केल्यास आम्ही गणेश विसर्जन करणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या पोलीस प्रशासनाची राहील याची आपण दक्षता घ्यावी आम्ही शासनाच्या सर्व अटी शर्तीचे पूर्ण पणे पालन करू व पोलीस प्रशासनानेही बॅण्डवर बंदी न आणुन आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी नंदुरबार तालुक्यातील गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आली.