नंदूरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता नंदुरबार विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कार्यक्रमाची तयारी हिंदी विषयाचे प्रमुख/शिक्षक एस.जी.एस. मन्सूरी सौ.ए.एस.बागुल यांनी केले. सदर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने हिंदी साहित्य,हिंदी लेखक माहितीचे फलक यांचे प्रदर्शन भरवण्यात आले.सदर प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्या सौ. विद्या चव्हाण यांनी केले सोबत पर्यवेक्षक ए.व्ही. कुवर, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून हिंदी भाषेचे महत्व समजून घेतले,

तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गासाठी हिंदी भाषेचे महत्व याविषयी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी अति उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदविला. अशाप्रकारे विद्यालयात हिंदी दिवस साजरा करून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्व व माहिती देण्यात आली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.