नंदूरबार l प्रतिनिधी
उधना-पाळधी मेमो आता भुसावळपर्यंत जाणार असून या गाडीला रेल्वे मंत्री मा.ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखवली.

उधना-पाळधी मेमो अनेक दिवसांपासून सुरू आहे.ही रेल्वे भुसावळ पर्यंत सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत होते.त्याची दखल घेत.उधना-पाळधी मेमो आता भुसावळपर्यंत धावण्यासाठी रेल्वे ने मंजुरी दिली आहे.येत्या एक दोन दिवसात उधना-पाळधी मेमो आता भुसावळपर्यंत धावणार आहे.या गाडीला काल दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर रेल्वे मंत्री मा.ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली
यावेळी खासदार सुभाष भामरे,आ.जयकुमार रावल जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, अनिल वानखेडे, नारायण पाटील, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, कामराज निकम, जिल्हा परिषद सभापती महावीरसिंह रावल, संजीवनी सिसोदे, पंचायत समिती सभापती वंदना ईशी, उपसभापती रणजित गिरासे, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.








