नंदूरबार l प्रतिनिधी
भूजगाव ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू विकण्याऱ्या परवानाधारक दुकानांना ठराव देण्यास बंदी घालण्यात आली असून दारूविक्री करण्यास बंदी घालण्याचा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.
धडगाव तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायतीत वेगवेगळे अभिनव प्रयोग राबविली जात असून सध्या नुकत्याच ग्रामपंचायत भुजगावची ग्रामसभा संपन्न झाली असून त्यात ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू बंदीचा ठराव पारित करण्यात आली. दारू मुळे अनेक संमाजिक प्रश्न निर्माण होत असून दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंब उधवस्त झालेले आहेत तर अनेक कुटुंब त्या मार्गावर आहेत. अश्यातच ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ग्रामसभेत ठराव करून दारू बंदी करून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
महिलासभा आणि बालसभेचे आयोजन
शासकीय परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेण्यापूर्वी बाल सभा घेणे बंधनकारक आहे. त्या अनुषगांने उपसरपंच कविता पावरा यांच्या अध्यक्षतेखाली आदल्या दिवशी महिलासभा आणि बालसभाचे आयोजन करण्यात आले. पाडा विकास कमिटीच्या माध्यमातून महिला सभेचे निरोप महिलांना देण्यात आला. मोठ्यासंखेने महिला सभेस उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले. महिला सभेत दारूबंदीच्या विषयावर सखोल चर्चा होऊन महिला सभेत दारूबंदीच्या ठराव बहुमताने पारित करण्यात आला.
दारूबंदीचा संदर्भात महत्वाचा ठराव
धडगाव तालुक्यात सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे दारूची व्यसनाधीनता. या महत्वाच्या प्रश्नावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभेत सखोल चर्चा करून ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारूबंदी करण्याचा ठराव करण्यात आला. हरणखुरी व भुजगाव गाव दारूबंदी क्षेत्र घोषित करण्यात आले. या पुढे दारुची विक्री केल्यास त्यांच्यावर दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई केली जाणार.
हे ठराव पारीत
१) ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू गाळून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली.
२) ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू पिऊन असभ्य वर्तन केल्यास,धिंगाणा घातल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार.
३) ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू विकण्याचा परवानाधारक दुकानांना ठराव देण्यास बंदी असेल.
४) गावात ग्रामपंचायत दारूबंदी ठरावाची जनजागृती करणार.
साधारणत: पाच तास चालेल्या ग्रामसभेत अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आले होते. त्यात विविध समित्यांची मंजुरी, वृक्षारोपण, रोजगार, कुपोषण, हातपंप दुरुस्ती जल जीवन मिशन योजनेचे माहिती आणि शासकीय योजनाची माहिती नागरिकांना देण्यात आले. सर्व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे देण्यात आली होती. कोणत्याही प्रश्नावर चर्चा सुरु असताना वाद विवाद झाला नाही. अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तालुक्यात काम करणाऱ्या आदिवासी जनजागृती,विधायक भारती प्रकल्प, सीनी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर (DSC) सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. आदर्श असा ठराव झाल्याने तालुका स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
“ ग्रामसभा हि गाव विकास आराखडयासाठी अत्यंत महत्वाची असते,परंतु नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवतांना दिसतात, हे गाव विकासासाठी धोक्याचे आहे. गावातील जनतेचा ग्रामसभेत आणि निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग वाढवा यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न केले जात आहे, कालच्या ग्रामसभेत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्यात गावात दारूबंदी पूर्णपणे बंदी एक मताने झालेला ठराव महत्वाचा ठराव ठरला ,त्यामुळे गावाचे सामाजिक स्वास्थ चागले राहील”
– अर्जुन पावरा, सरपंच ग्रामपंचायत भूजगाव
“ दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून अनेक अल्पवयीन मुले दारूच्या आहारी गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. आदिवासी संस्कृती पारंपारिक सण उत्सवाच्या काळात गावात मोठा कार्यक्रम घेण्यासाठी कायम मनात भीती असते. काही अनुचित प्रकार तर घडणार तर नाही ना? ग्रामपंचायत भुजगावाने दारूबंदीचा ठराव केला त्याचे स्वागत आहे.यामुळे गावाचे सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यास मदत होईल.
मोचडा पावरा, ग्रा.प.सदस्य भुजगांव








