शहादा l प्रतिनिधी
युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार,उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या निर्देशानुसार पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
परिसरातील गावांतून महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रत्येक गावातील माती अमृत कलशात टाकून संकलित करण्यात येणार आहे. मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील यांनी मोहीदे तह या शिवारातील माती अमृत कलशात टाकून उपक्रमाचे उदघाटन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रा.एम. के. पटेल यांनी अमृत कलशास माती अर्पण केली. शहादा तालुक्यातील विविध महाविद्यालयातील अमृत कलश पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात एकत्रित करण्यात येऊन सर्वांचा मिळून एक अमृत कलश शहादा तालुक्यातुन दि.25 ऑक्टोबर पर्यंत मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून तसेच संपूर्ण देशातून प्रत्येक तालुक्याचा कलश दि. 31 ऑक्टोबर पर्यंत दिल्ली येथे कर्तव्यपथावर नेण्यात येणार असून त्या मातीपासून तिथे अमृत वाटीका तयार करण्याचे भारत सरकारचे नियोजन आहे.यासोबतच महाराष्ट्र शासनाकडून सेल्फी विथ माय साॅईल या महत्वाकांक्षी अभियानाची सुरुवात समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या मोहिमद्वारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद करण्याचा शासनाचा मानस आहे. या उपक्रमात मंडळाच्या इतर शाखेतूनही सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत प्रा.पाटील यांनी सूचित केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.आर. एस. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ.एम. के. पटेल यांनी अभियानाच्या पुढील नियोजनाविषयी मार्गदर्शन केले.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी मेरी माटी मेरा देश अभियानातील रासेयोच्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.राजेंद्र पाटील, डॉ. वर्षा चौधरी, डॉ.वजीह अशहर व रासेयो स्वयंसेवकांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी नियोजन केले आहे.








