नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास महामंडळामार्फत धानाची व भरडधान्याची खरेदी करण्यात येत असते. त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक तुषार वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
केंद्र सरकारच्या आधारभुत किंमतीत खरेदी याजनेत राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळ धानाची व भरडधान्याची खरेदी करीत असते. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान/भरडधान्य पीकाची लागवड केली असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रियेद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास धान / भरडधान्य विक्रीला अडचणी निर्माण होऊ शकतात.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी त्वरीत ई-पीक पाहणीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करवी. ई-पीक पाहणी प्रक्रियेसोबतच धान/भरडधान्य विक्रीसाठी ज्या बँकेच्या खात्याची व्यवहारासाठी निवड करण्यांत येईल, तते बँक खाते अद्ययावत ठेवावे. तसेच ते खाते बंद नसावे. तसेच या बँक खात्यासोबत आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. हे बॅंक खा ते हे जनधन योजनेत सामाविष्ट नसल्याची खात्री करुन घ्यावी. संयुक्त खाते असल्यास पहिल्या खातेदाराचे आधार जोडणी करुन ज्ञुल प्रक्रिया पूर्ण करावी किंवा स्वतंत्र खाते सुरु करावे. ह्या सर्व प्रक्रिया शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी पुर्ण कराव्यात, त्यामुळे शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे सुलभ होईल, असेही महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक श्री. वाघ यांनी केले आहे.