नंदुरबार प्रतिनिधी
आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे मेरी ममिट्टी मेरा देश हे अभियान राबविण्यात आले यात नंदुरबार नगर परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या विविध आंतर शालेय स्पर्धेत श्रॉफ विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले.
चित्रकला स्पर्धा प्रथम आरुषी बागुल, रांगोळी स्पर्धा प्रथम आरुषी बागुल व उत्तेजनार्थ बक्षीस चिन्मय पाटील, रुद्राक्ष सोनार तसेच वकृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक नेहा पाटील. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक शांभवी कुलकर्णी, उत्तेजनार्थ मोहित सोनवणे, प्रश्नमंजुषा शुभम निर्मल या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड.रमणलाल शाह, संस्थेचे सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक जगदीश पाटील, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया यांनी अभिनंदन केले. वरील विद्यार्थ्यांना महेंद्र सोमवंशी, हेमंत पाटील, प्रा.गणेश पाटील, योगेश शास्त्री, गायत्री पाटील, देविदास पाटील, शिवाजी माळी, महेश पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.