Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी भरतीसाठी परिक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

team by team
September 13, 2023
in राष्ट्रीय
0
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी भरतीसाठी परिक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

नंदुरबार प्रतिनिधी

 

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाच्या (एस.एस.बी.) परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी युवक-युवतींसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात (नाशिक रोड) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

शासनामार्फत राज्यातील युवक-युतींसाठी 3 ऑक्टोंबर 2023 ते 12 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत एसएसबी प्रशिक्षण क्र. 54 चे आयोजन करण्यात आले असून प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे.

 

 

यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस जातांना एसएसबी प्रशिक्षण क्र. 54 चे शिफारसपत्र व परिपूर्ण भरलेले परिशिष्ट दोन प्रतीत सादर करावे लागेल. सदर शिफारसपत्र व परिशिष्ट सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावरील एसएसबी प्रशिक्षण क्र. 54 अथवा व्हॉटसॲप क्रमांक 9156073306 यावर एसएसबी 54 हा संदेश पाठवून उपलब्ध करता येईल.

 

 

प्रशिक्षणासाठी पात्रता

कंम्बाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
एनसीसी सटिफिकेट मअफ किंवा मबफ ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रूप मुख्यालयाने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे .
युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. यापैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक असून त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी असणे आवश्यक आहे.

 

 

प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांचा ईमेल पत्ता .. व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 यावर किंवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहनही मेजर डॉ. पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जयराजे व्यायाम शाळा गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी रुपेश जगताप तर सचिवपदी कल्पेश पाटील

Next Post

मेरी मिट्टी मेरा देश या अभियानात श्रॉफ हायस्कूलची उतुंग भरारी

Next Post
मेरी मिट्टी मेरा देश या अभियानात श्रॉफ हायस्कूलची उतुंग भरारी

मेरी मिट्टी मेरा देश या अभियानात श्रॉफ हायस्कूलची उतुंग भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add