Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’

team by team
September 13, 2023
in राज्य
0
मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’

राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना,उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची, विभागांची निर्मिती राज्य शासन करत असते. या पार्श्वभूमीवर  मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या, युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथीची स्थापना करण्यात आली आहे.

सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक  प्रगतीसाठी  विविध कल्याणकारी उपक्रम,योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. पीएच.डी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107 तर शिक्षण विभागातंर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.तर कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तर सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत 60 हजार 140 जणांना लाभ झालेला आहे.

संरचना आणि निधीची तरतूद

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन 2023-24 या आर्थिक वर्षात 300 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे  मुख्यालय पुणे येथे असून  उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच सारथीचे  राज्यात 8 विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली Indian Companies Act 2013 & Rules कंपनी कायदा – 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबध्द त-हेने व प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्यात येते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. सारथी संस्थेचे संस्थापन समयलेख Memorandum of Association & Article of Association (MoA व AoA) हे Registrar of Companies यांचेकडे चार जून 2018 रोजी नोंदणीकृत केले असून त्यामध्ये नमूद तीन  मुख्य उद्दिष्टे व 82 पूरक उद्दिष्टानुसार संस्थेचे कामकाज चालू आहे.

सारथीमार्फत राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक प्रगतीच्या योजना महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग या उपक्रमातंर्गत सारथीमार्फत युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परिक्षा विभाग सक्रीयरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या  पूर्व परिक्षेसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थांना दरमहा 13 हजार व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रु.विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.

उपयुक्तताः- आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत एक हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 21 कोटींचा लाभ डिबिटी द्वारे देण्यात आला आहे. युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पन्नास हजार रु.एकरकमी दिले जातात. सारथी मुख्यालयातून विद्यार्थ्यांना झूम मिटींगद्वारे मार्गदर्शनही करण्यात येते. त्यांच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर त्या सोडवण्यात येतात. मागील तीन वर्षांत साडेसहाशे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3.25 कोटींचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रु.एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षांत 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाखांचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.

यशस्व‍िताः- युपीएससी परिक्षांमध्ये सारथीच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत असून आयएएस सेवेत तीन वर्षात बारा,आयपीएस मध्ये 18 तर आयआरएस सेवेत आठ आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये एकुण बारा अशा सारथीमधील 51 विद्यार्थ्यांची युपीएससी परीक्षेत निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी सारथी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच युपीएससी सीएपीएफ सेवेसाठी संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

राज्यसेवा प्रशिक्षण मार्गदर्शन – युपीएससी प्रमाणेच राज्य सेवा परिक्षा अर्थात एमपीएससीमध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,कोचींग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  एमपीएससी साठी साडे सातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.

उपयुक्तताः- आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत 1125 विद्यार्थ्यांना पूर्व परिक्षेसाठी 8.26 कोटीचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार एक रकमी दिले जातात.आत्तापर्यंत मागील तीन वर्षात 7367 विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी अकरा कोटी रुपयांचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.तसेच मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहा हजार रु.एकरकमी दिले जातात.त्यासोबतच विद्यार्थ्यांना सारथीच्या मुख्यालयातून झूम मिटींगद्वारे तसेच अभिरुप मुलाखत द्वारेही मार्गदर्शन केल्या जाते.मुलाखतीची सर्व तयारी करुन घेण्यात येते.

यशस्व‍िताः- मागील तीन वर्षांत 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 56.60 लाखाचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.सारथीच्या मार्गदर्शातून सन 2021-22,23 या वर्षात वर्ग एक श्रेणीमध्ये 74 तर वर्ग दोन श्रेणीत 230 अशा एकूण 304 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.

उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती

        डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जूलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर  एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना  परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती  योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जूलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.  यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF)

या अतंर्गत सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे/ विकसित करणे. संशोधन पुर्ण होईपर्यंत परंतू कमाल पाच वर्षाच्या कालावधी करिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह रू.31,000/- अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकुण 2109 विद्यार्थांचा सहभाग आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम(csms-deep) राबवण्यात येतो. दि.1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36,525 अर्जांपैकी अंतिम छाननीतून सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जांची संख्या 27,346 इतकी आहे.

छत्रपती राजाराम महाराज – सारथी शिष्यवृत्ती 2022-23 योजना

यामध्ये एकूण 31.23 कोटी रु. वाटप करण्यात आले आहे. यासाठी  इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, दहावी मध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रू.800 प्रमाणे वार्षिक रू.9600/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.  तर मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF)- सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

सन 2022-23 पासून ही  योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण,कापनीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन,वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 रोजी देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून प्रशिक्षणाचे राज्यातील 26 ठिकाणी सुरवात करण्यात येईल. याचे वार्षिक लाभार्थी हजार असणार आहेत.

सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

या कार्यक्रमांतर्गत 35 सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत वीस हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थी नोंदणी सुरु असून 186 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध वयोगटातील एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 5290 विद्यार्थ्यांना 10.25 लक्ष रुपयांची पारितोषिके देण्यात आली आहेत.  तसेच  करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरांचे ही राज्यभरात विविध जिल्ह्यांत आयोजन केल्या जाते. ज्याचा विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.

विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प/योजना

या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथी मार्फत  श्रीमंत मालोजीराजे – सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद,पुणे,कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरात ही 3 जूलै 2023 रोजी  प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये  औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्यावत,आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक रेडी टू वर्क मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.

विविध पद्धतीने सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी,आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम,योजना राबवण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्य शिकवणुकीला मूर्त रुप देण्याच्या दिशेने ‘सारथी’च्या माध्यमातून शासनाची सुरु असलेली वाटचाल निश्चितच आश्वासक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई

Next Post

जयराजे व्यायाम शाळा गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी रुपेश जगताप तर सचिवपदी कल्पेश पाटील

Next Post
जयराजे व्यायाम शाळा गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी रुपेश जगताप तर सचिवपदी कल्पेश पाटील

जयराजे व्यायाम शाळा गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी रुपेश जगताप तर सचिवपदी कल्पेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add