Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खान्देश दिगम्बर जैन समाजाचा रविवारी कुसुंब्यात भव्य मेळावा

team by team
September 11, 2023
in राज्य
0
खान्देश दिगम्बर जैन समाजाचा रविवारी कुसुंब्यात भव्य मेळावा
नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर येत्या 17 सप्टेंबर रविवार रोजी 20 व्या शतकातील प्रथमचार्य आचार्य श्री 108 शांतीसागर महामुनी श्री यांची 68 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष व दिगंबर जैन महासभेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश जैन यांनी केले आहे.
या मेळावा संदर्भात अधिक माहिती देताना सुरेश जैन यांनी म्हटले आहे की, आचार्य श्री 108 शांतीसागर महामुनी श्री यांचे   दिगंबर जैन समाजावर असलेल्या उपकारांची उतराई त्यांचा गुण अनुवाद त्यांना आदरांजली म्हणून हा महोत्सव साजरा होणार आहे  तसेच या महोत्सवाचे औचित्य साधून जैन समाजाचे एकीकरण, सर्वांगीण विकास, जैनत्व वर्धन व अहिंसा धर्म प्रभावना  या उद्देशाने दिगंबर जैन समाजाचा मेळावा खान्देश समाजाच्या सहभागानेच मुख्य कार्यक्रम कुसुंबा येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी लहान्यापासून थोरांपर्यंत पार्श्वनाथ जैन सेवा प्रतिष्ठान तसेच पद्मावती युवा मंच, सकल दिगंबर जैन समाज जोमाने  करित असल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख आणि प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली.
या क्षेत्रावर चातुर्मास स्थीत असलेले आचार्य श्री 108 पवित्र सागरजी महाराजजींचे परम प्रभावी शिष्य मुनि श्री प्रभावसागर महाराजजी आणि मुनि श्री प्रभातसागर महाराजजी युगल मुनिच्या सानिध्यात धर्म संस्कार, व्रत संस्कार, जैन समाज सम्मेलन, आचार्य शांतीसागर महाराज पुण्यतिथी, भव्यशोभा यात्रा, मंगल प्रवचन तसेच धर्म चर्चासत्र आदि कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या सम्मेलन महोत्सवास खान्देशातून बहुसंख्य समाज बांधवाची उपस्थिती लाभणार असल्याचा प्रथम अंदाज आहे. येणाऱ्या श्रावक व श्राविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्गदर्शक म्हणून प्रतिष्ठाचार्य श्री प्रदीपकुमार मधुर शास्त्री यांचे मार्गदर्शन मिळत आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी पार्श्वनाथ सेवा समितीचे पद्मावती युवा मंच व समाज बांधव विशेष  परिश्रम घेत आहेत. असेही सुरेश जैन यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग

Next Post

चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे – राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे

Next Post
चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे – राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे

चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे - राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add