Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे – राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे

team by team
September 11, 2023
in राज्य
0
चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे – राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे
 नंदुरबार l प्रतिनिधी
आबू रोड – सोशल मीडियाचा अविवेकी वापर, चॅट जीपीटी, कृतीम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स यामुळे मानव समाज विचारांच्या यांत्रिकीकरणाच्या दिशेने जात असून हे माध्यमातील सर्वांत चिंताजनक अभिसरण आहे. यासाठीच माध्यमांनी मूल्याधिष्ठीत समाज निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माऊंट आबू येथे ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागामार्फत राष्ट्रीय मीडिया संमेलनात जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.
जागतिक शांती आणि सदभावनेसाठी सशक्त मीडिया विषयावर भारत आणि नेपाळ देशातील 1500 पत्रकारांचे माध्यम संमेलन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रानंतरच्या नियोजन सत्रात सोशल मीडियाचा समाजावरील प्रभाव या विषयावर मंथन करण्यात आले. मुख्य बीज भाषण जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.
`टुल्स` दोषी नसून `युजर` दोषी :मुख्य संबोधनात त्यांनी सोशल मीडियाचा अविवेकी वापर, कृतिम बुद्धीमत्ता आणि चॅट जीपीटी सारख्या साधनांच्या वापरामुळे जागतिक पातळीवर होणा·या मानव समाजावरील प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली. टेक्नॉलॉजीचे `टुल्स` अर्थात साधने दोषी नसून `युजर` अर्थात वापरकर्ता दोषी असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी बी.के. निकुंज, राष्ट्रीय समन्वयक मीडिया प्रभाग, मुंबई यांनी माध्यमांनी भाव आणि भावनाच्या आधारे वृत्तांकन करावे याबद्दल आपले विचार व्यक्त केले.  या सत्रात वाय. बाबजी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, हैद्राबाद, बी.के. नाथूमल, कटक, डॉ. पी. शिवस्वरुप, इग्नो, नागपूर, डॉ. आरती त्रिपाठी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, दिल्ली, डॉ. कमलेश मीना, पटना, डॉ. अवा शुक्ला, अहमदाबाद आदिंनी आपले समायोचित विचार मांडलेत. सत्राची अध्यक्षता डॉ. नरेंद्र कौशिक, जयपूर पत्रकारिता विद्यापीठ यांनी केले. बी.के. योगीनी, अजमेर यांनी सत्र संचलन केले.
महाराष्ट्रातून चारशे माध्यम प्रतिनिधींचा सहभाग :
राष्ट्रीय मीडिया संमेलनात महाराष्ट्र राज्यातून विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, एफ. एम. रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, समाज माध्यमे आदि मिळून  सुमारे 400 हून अधिक मीडिया प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयनाचे काम डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे. 12  सप्टेंबरपर्यंत चालणा·या राष्ट्रीय संमेलनात अनेक माध्यम तज्ज्ञ, प्रकाशक, मालक यांनी जागतिक शांतीसाठी माध्यमांच्या योगदानाबद्दल चर्चा करतील.
बातमी शेअर करा
Previous Post

खान्देश दिगम्बर जैन समाजाचा रविवारी कुसुंब्यात भव्य मेळावा

Next Post

गुलाम बाबा महाराज यांची आष्टाने ते रंजनपुर व्यसनमुक्ती रॅली

Next Post
गुलाम बाबा महाराज यांची आष्टाने ते रंजनपुर व्यसनमुक्ती रॅली

गुलाम बाबा महाराज यांची आष्टाने ते रंजनपुर व्यसनमुक्ती रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add