नंदुरबार l प्रतिनिधी
“आला रे आला गोविंदा आला” च्या जयघोषात नंदुरबार शहरातील सुभाष चौक मैदानात कै. शांतीसागर सुपडू पैलवान यांची जय बजरंग व्यायाम शाळा आयोजित दहीहंडी उत्सवात शहरातील बारा व्यायाम शाळांच्या गोविंदांनी दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.
नंदुरबार शहरातील सुभाष चौक मैदानात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर, बाळवंत जाधव, राजेश परदेशी, प्रतापसिंग राजपूत, किरण चौधरी, डॉ. नरेंद्र पाटील यांच्यासह जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष शेखर मराठे, देवेंद्र बोरसे, जितेंद्र मराठे, संजय भदाने, विश्वनाथ मराठे, रिद्धेश सोलंकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दहीहंडी फोडणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या गोविंदाचे अभिनंदन करून त्यांना ढाल देऊन सन्मानित करण्यात आले. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये जय हनुमान व्यायाम शाळा, द्वारकाधीश व्यायाम शाळा, मारुती व्यायाम शाळा, संत सावता महाराज व्यायाम शाळा माळी वाडा, जय संताजी व्यायाम शाळा, रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळा, गुरुकृपा व्हल्लार समाज श्रीराम सेना, व्हल्लार समाज व्यायाम शाळा, मांग गारुडी समाजाची जय शिबारी व्यायाम शाळा, सार्वजनिक मित्र मंडळ, तेली वाडा मित्र मंडळ, मोठा मारुती मित्र मंडळ या व्यायाम शाळांच्या गोविंदा पथकाने सहभाग घेतला. शहरातील नागरिकांनी गोविंदा पथकांचा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.








