नंदुरबार l प्रतिनिधी
रिमझिम पावसाच्या सरीत शहरातील गोविंदांनी मच गया शोर तारी नगरी रे… गोविंदा आला रे…. यासह ढोल ताशांचा गजरात शहरातील विविध व्यायाम शाळेतील गोविंदांनी दहीहंडी फोडून जल्लोष केला.
नंदूरबार येथील तूप बाजार मध्ये जय हनुमान व्यायाम शाळेमार्फत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी श्रीकृष्ण च्या प्रतिमेस पूजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपाधीक्षक संजय महाजन, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, माजी नगरसेवक गौरव चौधरी, मोहन खानवाणी, ईश्वर चौधरी, राजेश रघुवंशी, वकील पाटील, बलवंत जाधव, मोहन श्रॉफ, ईश्वर धामणे, दिनेश अग्रवाल, राजू जैन हे उपस्थित होते.
या दहीहंडी कार्यक्रमात शहरातील सहा पथकांचा समावेश होता. यात सावता माळी व्यायाम शाळा, द्वारकाधीश व्यायाम शाळा, मारुती व्यायाम शाळा, होलार वाडा व्यायामशाळा, जय हनुमान व्यायाम शाळा, सार्वजनिक व्यायाम शाळा या व्यायाम शाळेच्या गोविंदांनी दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडणाऱ्या व्यायाम शाळेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सदर दहीहंडी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जय हनुमान व्यायाम शाळेचे जय मराठे, भीमा मराठे, कैलास मराठे, तुकाराम मराठे, दादा बडगुजर, सचिन चौधरी, सुरेश तांबोळी, मुकेश मोची, लल्ला मराठे, दादू मराठे, वेदांत मराठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने गोविंदा सहभागी झाले होते.








