नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयात पाऊसाचे प्रमाण जुन महिन्यापासून खूपच कमी आहे. तसेच जमीनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुध्दा करपून गेली आहेत. नंदुरबार जिल्हयात कापूस, बाजरी, ज्वारी, मुग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिके मोठया प्रमाणावर घेतली जातात. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे येणाऱ्या पिकांचे उत्पन्न येणार नाही. तसेच भविष्यात गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळणार नाही,
गुरांनाही चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचे असल्याने शासनाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असुन गावकन्यांसह शेतकन्यांनी नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करावा अशी मागणी केलेली आहे. नंदुरबार जिल्हयातील भीषण दुष्काळी संकट पाहता नंदुरबार जिल्हा हा दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी नंदूरबार विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.








