नंदूरबार l प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यावर्षीही शहरातील कै. शांतीसागर सुपडू पहेलवान यांच्या जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवानिमित्त “आला रे आला गोविंदा आला” च्या घोषणांनी नंदनगरी दुमदुमणार आहे. शहरातील तरुणांसाठी हा उत्सव म्हणजे पर्वणीच ठरत असते.
मुंबईच्या सुप्रसिध्द दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार शहरातील कै. शांतीसागर सुपडू पहेलवान यांच्या जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे गोपाल कालानिमित्त दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा हा उत्सव दि. ८ सप्टेबर २०२३ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता सुभाष चौक मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील 12 व्यायाम शाळांचे गोविंदा पथक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जय बजरंग व्यायाम शाळेचे पदाधिकारी सर्वश्री शेखर मराठे, जितेंद्र मराठे, संजय भदाणे व देवेंद्र बोरसे यांनी केले आहे