नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नवा भोई वाडा परिसरातील नगर पालिका शाळा क्रमांक 9 जवळ उभारण्यात आलेल्या
अर्धनारीश्वर (भोळा महादेव) मंदिरात श्रावण सोमवार निमित्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.माजी नगराध्यक्षा सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महापूजा होईल. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी उपस्थित राहतील.दरम्यान रविवारी सजविलेल्या बैलगाडीतून शिवलिंग मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
कलशधारी बालिका आणि महिलांच्या उपस्थितीने मिरवणूक लक्षवेधी ठरली. डीजेच्या तालावर हर हर महादेवचा जयघोष करीत मिरवणूक मोठा मारुती मंदिरापासून कुंभारवाडा, गवळीवाडा, बालवीर चौक, नवा भोईवाडामार्गे न.पा. शाळा क्रमांक 9 जवळील मंदिरात पोहोचली.मंदिर अतिशय सुंदर व देखणे तयार झाले असून शनिवार पासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
दरम्यान आज सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी महापूजा होईल. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. भाविकांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आवाहन अर्धनारीश्वर (भोळा महादेव) मंदिर शिवभक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.