म्हसावद । प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील आक्राळे येथून मदारी कडुन सर्पमित्र यांनी साप ताब्यात घेऊन जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
नंदूरबार तालुक्यातील आक्राळे या गावात मदारी सापाचा खेळ करत असल्याची बातमी वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार चे सदस्य सर्पमित्र संजय वानखेडे यांना मिळाली संजय वानखेडे यांनी त्यांच्या सहकारी मित्र देवेंद्र वसयकर,ओम कोडक,वैभव राजपुत, राहुल कोळी, रोहित राजपुत यांना सोबत घेऊन आक्राळे गाव गाठले तेथे मदारी सापाचा खेळ करत होता. मदारी कडुन साप ताब्यात घेण्यात आला.
सदर मदारी वन्यजीव प्रेमींना बघुन घाबरुन पळुन गेला.सापाला ताब्यात घेऊन वनविभाग नंदुरबार येथे आनण्यात आले तेथे आर एफ ओ वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली बिलाल शहा यांच्या सोबत वैद्यकीय तपासनी साठी पाठवण्यात आले व नंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सापास सुखरुप जंगलात सोडुन देण्यात दिले