नंदूरबार प्रतिनिधी
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना नंदुरबार रिपाई युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी विविध विषयांचे निवेदन दिले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर जळगाव येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारीता राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे अध्यक्षस्थानी होते.महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे,महाराष्ट्र राज्य सचिव सुमित वजाळे, जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी,धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा सरचिटणीस राम साळुंके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नंदुरबार रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी ना.रामदास आठवले साहेब यांची भेट घेऊन विविध विषयांचे निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील गौतम नाना जाधव या 24 वर्षीय दलीत युवकाची फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करून फसवणूक केली. पैशांची मागणी पुर्ण न केल्यास बदनाम करण्याची धमकी देऊन 39 हजार वसूल केले. वारंवार ब्लॅकमेल केले जात असल्याने ब्लॅकमेलिंगच्या जाचास कंटाळून सदर युवकानी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करून घेतली. तरी सदर युवकाच्या कुटुंबीयांना युवकाच्या आत्महत्यास जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन करून न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी केली.
तसेच नंदुरबार जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके करपली असून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गहण प्रश्न निर्माण झाला आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करणेबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा कृषी मंत्री यंना सूचना देण्यात याव्या. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.तसेच मागील अनेक दिवसांपासून मनोहर कुलकर्णी नामक उर्फ भिडे गुरुजी या विकृत माणसाने महाराष्ट्रातील तसेच देशातील महापुरुषांबद्दल अपमानकारक विधाने करून महाराष्ट्रातील सामाजिक एकोपा बिघडवून सामाजिक दंगली घडविण्याच्या उद्देशाने, बहुजन समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत.
सदर विकृत व्यक्ति विरोधात बहुजन समाजातील रिपब्लिकन आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलना संदर्भात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तरी सदर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.भीमा कोरेगाव सारख्या दंगलीतील प्रमुख आरोपी असलेल्या या तथाकथित भिडे गुरुजी नावाच्या व्यक्तीस तात्काळ अटक करून शासन करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.यावेळी लोकसभा प्रमुख अनिल कुवर, एड. प्रेमानंद इंद्रजीत, जिल्हा नेते सुलतान पिंजारी, युवक शहरअध्यक्ष सचिन पिंपळे,अध्यक्ष गणेश पवार सौरव साळुंके, नंदुरबार युवक तालुका अध्यक्ष विजय पानपाटील शहादा युवक तालुकाध्यक्ष दीपक अहिरे, उपाध्यक्ष विनोद समुद्रे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.