टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या स्मरणार्थ २२ व्या महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट मुले- मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जी टी पाटील महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन
जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.महेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे निरीक्षक उस्मान सिद्दिकी राज्य संघटनेचे सचिव डॉ.मोहम्मद बाबर, राज्य उपाध्यक्ष धनंजय धोत्रे, ड्रीम कंट्रक्शन चे किरण तडवी, माजी सभापती कैलास पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेश रघुवंशी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेवक विलास रघुवंशी, जी.टी.पाटील
महाविद्यालयाचे समन्वयक महेंद्र रघुवंशी जिल्हाध्यक्ष पुष्पेन्द्र रघुवंशी, सचिव प्रा.डॉ.मयूर ठाकरे, आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना डॉ. रघुवंशी यांनी खेळाडूंना क्रिकेट स्पर्धेत संधी असून या स्पर्धांमधून सकारात्मक ऊर्जा तयार होऊन खेळाच्या क्षेत्रात आवड व शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते यासाठी रोज मैदानावर सराव करा सातत्य ठेवा येणाऱ्या काळात स्पर्धांमधून महाराष्ट्राच्या नावलौकिक वाढेल अशी कामगिरी करा अशा शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातून मुलांचे ३४ तर मुलींचे १७ संघ नंदुरबार शहरात दाखल झाले असून सदर स्पर्धा १ ते ३ सप्टेंबर दरम्यान होत आहे या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार असून श्रीनगर जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय
स्पर्धेत हा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्पर्धेला तांत्रिक समितीत विशाल पवार, परवेझ खान, वासिफ पटेल, जगदीश वंजारी, भागुरव जाधव, आदी काम पाहत आहेत स्पर्धा यशस्वीतेसाठी भरत चौधरी अमोल चित्ते जितेंद्र माळी आकाश माळी मनीश सनेर योगेश माळी, जितेंद्र पगारे, विजय जगताप, आदी काम पाहत आहेत.