नंदुरबार l प्रतिनिधी
समशेरपुर येथील आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याने सन २०२२-२३ मध्ये ऊस तोडणी मजूर यांचा मेडिक्लेम तसेच बैलाचा विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स यांचे मार्फत उतरविला आहे. सन २०२२-२३ मध्ये मजुरांचा नैसर्गीक, आकस्मित किंवा अपघाती मरण पावलेल्या मजुरांचे आर्थिक मदतीसाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा करुन मजुरांच्या वारसांना प्रत्येकी तीन लाखाचा विमा मंजूर करुन घेण्यात आला. असे एकूण ६ वारसदारांना एकूण १८ लाख रूपये मंजूर झाले.
संचालक सचिन सिनगारे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप झाले. यावेळी जनरल मॅनेजर पद्माकर टापरे, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील, ऊस विकास अधिकारी वसंत माळी व गटप्रमुख उपस्थित होते. विमा कंपनीचे मुख्य प्रबंधक श्री.लगड यांची मोलाची मदत झाली.
शेतकी अधिकारी ए.आर पाटील यांनी मदतीसाठी सतत पाठपुरावा केला. यावेळी मयतांचे वारस तुषार शिंदे यांनी कारखान्याने केलेल्या कार्याचे व मदतीचे आभार मानले व समाधान व्यक्त केले. आयान साखर कारखाना ऊस तोडणी मजुरांचे कायम पाठीशी उभा असतो अशी भावना व्यक्त केली.








