नंदूरबार l प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याच्या निषेधार्थ नंदूरबार येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू होते.यावेळी मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाला याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज नंदूरबार जिल्हा यांच्या तर्फे आज 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेला जगताप वाडी चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान जिल्हयात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती असल्याने जिल्हा बंद मागे घेण्यात आल्याचे समन्वयक नितीन जगताप यांनी सांगितले.
दरम्यान शहरातील जगतापवाडी येथे सकाळी 9.30 वा दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
बसबंद मुळे 45 लाखाचा फटका
जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाक दिली होती.त्यानंतर जिल्हा बंद मागे घेण्यात येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.प्रशासनातर्फे काल रात्रीच बस बंदचा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यातील नंदूरबार, शहादा, अक्कलकुवा आगारातील बसेस बंद होत्या तर नवापूर आगारातील काही बस फेऱ्या सुरू होत्या.जिल्हाभरात 700 बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने सुमारे विविध आगाराला 45 लाखाचा फटका बसला आहे.








