नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील के.डी.गावित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य देवमन पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विशाल पवार, उपसरपंच महेंद्र पवार यांच्या हस्ते ८ विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुखयाध्यापक/प्राचार्य बी.डी.पाटील तसेच लाभार्थी विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.जी.राजपूत यांनी केले. आभार व्ही.यु.घुगे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक जी.के.पवार, आर.पी.शहा, आर.एस.जगताप, एस.आर.माळी, जे.के.मराठे, ज्युनिअर कॉलेजचे प्रा.जी.वाय.सोनवणे, श्री.शेवाळे, डी.बी.पाटील, एन.एस.पाटील, तसेच शिक्षकेतर कर्मचारी ए.बी.पाटील, व्ही.एच.पाटील यांनी परिश्रम घेतले.








