नंदुरबार l प्रतिनिधी
बारा वर्षे रखडलेल्या धडगाव तालुक्यातील उदय नदीवरील पुलाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवला असून 45 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील बिलगाव आणि सावऱ्या दिगर गावांना जोडणारा आदिवासी समाज बांधवांसाठी दळणवळण करीता महत्त्वाचा उदय नदीवरील पूल मागील दहा ते बारा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत रखडला होता, दरम्यानच्या काळात नंदुरबार जिल्हाला आदिवासी विकास मंत्रीपद असताना देखील त्या कामाला निधी मिळू शकला नव्हता. शासन दरबारी असंख्य पाठपुरावा केल्यानंतरही निधी अभावी काम अपूर्ण अवस्थेत होते, दिनांक 15 जून 2023 रोजी नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली , तसेच या चर्चेतून सदर पुलाचे महत्त्व अजित पवार यांना समजले.
दरम्यानच्या काळात नामदार अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सिताराम पावरा यांनी अजित पवार यांच्याकडे पुनश्च या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला, त्या पाठपुरावास प्रतिसाद देत अजित पवार यांनी त्वरित 45 कोटीचा निधी या उदय नदीच्या पुलासाठी मंजूर करून लवकरात लवकर सदर पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकारी यांना दिल्या.
त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी नामदार अजित पवार यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबई येथे भेट घेऊन धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.