नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे वर्षभरात एक ही पूर्ण झाले नसून अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने बोगस कामे सुरू असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि. प.सदस्य आक्रमक झाल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव एक मुखाने मंजुर करण्यात आला.
नंदुरबार जि.प.ची सर्वसाधारण सभा अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती सौ.संगिता भरत गावित, सभापती हेमलता शितोळे , जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेच्या सुरवातीला जि.प.सदस्य अर्चना गावीत, जयश्री गावित,भरत गावित यांनी जिल्हयात जलजीवन मिशनची कामे वर्षभरापासून अपूर्ण आहेत असे सांगत पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर हे त्यांच्या आधीच्या ठिकाणी नोकरी करीत होते तेथील ठेकेदार यांच्या संगनमताने जलाजीवन मिशनची कामे करीत असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत संतप्त जि.प.सदस्य आक्रमक झाले.
पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांना बैठकीतून बाहेर काढण्यात यावे.ही मागणी लावून धरली.कार्यकारी अभियंता यांना बैठकीतून बाहेर न काढल्यास बैठकीत बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला.त्यानंतर .कार्यकारी अभियंता यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले.पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव एक मुखाने मंजुर करण्यात आला.तसेच संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी जि.प.सदस्य भरत गावित यांनी केली.
दरम्यान नवापूर तालुक्यातील पांघराण येथे एका संस्थेकडुन दुध संकलन होत नाही तरी टॅकर भरुन दुध बाहेर पाठविले जाते असे सांगत जि.प.सदस्य राया मावची यांनी याठिकाणी दुधाची नमुने घेण्याची मागणी केली. . त्यावर जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी संबंधित दुध संकलन केंद्राची चौकशी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान जिल्हयात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल शाळा करण्यासाठी मागविलेले सामान पडून असल्याचे निदर्शनात आणले.
यावेळी जि.प.सदस्य प्रताप वसावे यांनी प्रशासनाला धारेवर धरत जिल्हा परिषदेच्या प्रत्येक बैठकीत भ्रष्टाचार चा विषय गाजतो असे सांगत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा मुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत असल्याचे सांगत हे कोठे तरी थांबायला हवे असे आवाहन केले.तर त्याला उत्तर देताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी सांगितले की, अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी पैसे घेतले जातात यासाठी अधिकारी व मधस्थी यांची सांगड
असून.ठेकेदारांना कामाच्या आधी बिले अडा केली जातात तर शेतकऱ्यांना वेळेवर निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.दरम्यान जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी याकडे लक्ष घालून समन्वय साधण्याचे काम करण्याचे आवाहन सदस्य भरत गावित यांनी केला.