नंदूरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे माजी सचिव राहुल पाटील, सदस्य शेखर कोतवाल आणि सुप्रिया कोतवाल आणि उपस्थित होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी या होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा दिवसाचे शुभेच्छा फलक हवेत रंगेबेरंगी फुग्याद्वारे सोडून करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या प्रचारांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि शाळेच्या प्राचार्यांच्या सत्कार क्रीडा शिक्षकांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांची प्रतिमा देऊन करण्यात आले यावेळी प्रास्ताविक मनिष पाडवी यांनी केले व सर्वांना क्रीडामय शुभेच्छा दिल्या यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना उजाळा देत क्रीडा दिवसाचे महत्त्व शाळेतील क्रीडा शिक्षिका एस.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी ज्यूदो, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, आर्चरी मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, वेटलिफ्टिंग,रग्बी,झुंबा डान्स आदी.विविध खेळांचे साहित्यांसहीत वेशभूषा परिधान करून फॅशन शो दाखवण्यात आले,आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी हॉकी,फुटबॉल,क्रिकेट,बॅडमिंटन आदी खेळांचे आकर्षक स्पोर्ट्स डान्स सादर केले.
ह्यावेळी एकूण 42 विद्यार्थ्यांनी मल्लखांब खेळाचे एकाहून ऐक आकर्षक प्रात्यक्षिके दाखवले तसेच क्रीडा दिवसाचे औचित्य साधून धनुर्विद्येचे पहिले प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल येथे सुरू करण्यात आले असून ह्यावेळी विद्यार्थ्यांनी धनुर्विद्येचे विविध प्रात्यक्षिके दाखवली,हॉकी खेळातील पॅनल्टी स्ट्रोक चे प्रदर्शन दाखवण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त करणारे खेळाडू आणि ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मनेष ठाकरे याने प्रथम क्रमांक पटकावत कौतुक करण्यात आले यानिमित्ताने अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले की,निरोगी शरीर व मन राखण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे तसेच खेळाडू वृत्ती निर्माण होत असून जीवनात अनेक संकटे व अपयश ठरवण्यासाठी होतात आणि तंदुरुस्त तसेच स्वास्थ पिढी निर्माण होण्यासाठी खेळाचे महत्व जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे
विद्यार्थ्यांनी खेळामध्येही करिअर केले पाहिजे, यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचे माजी सचिव राहुल पाटील, माजी सदस्य शेखर कोतवाल आणि सुप्रिया कोतवाल, शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, अरुण गर्गे, ललिता पानपाटील, उर्मिला मोरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील क्रीडाशिक्षक मीनल वळवी, सतीश सदाराव, शारदा पाटील, खुशाल शर्मा यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मनीष पाडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन खुशाल शर्मा यांनी केले.