नंदुरबार l प्रतिनिधी
कोपर्ली विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी गुलाब अब्बास पिंजारी तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण छगन मराठे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या सत्कार शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या सत्कार आमदार कार्यालयात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,कोपर्लीचे माजी चेअरमन डॉ.बिर्ला, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील,नवीन बिर्ला,बापू मराठे,अशोक तांबोळी, इरफान खाटीक,रवींद्र मराठे,जितेंद्र राजपूत,छोटू चौधरी, बाला बिर्ला,भिका शिंपी,प्रीतम चौधरी तसेच संचालक मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते.