नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यात जून महिन्यापासूनच कमी पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याअभावी पिके करपून गेली आहेत.शनिमांडळ, रनाळे, खोंडामळी मंडळात परिस्थिती अत्यंत भयानक असुन, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न देखील उद्भवल्याने संपूर्ण तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेने ( शिंदे गट) तर्फे करण्यात आली आहे.
याबाबत मंगळवारी शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व गावातील प्रमुखांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनाची प्रत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी स्वीकारली. निवेदनात म्हटले, नंदुरबार तालुक्यात पासावसाचे प्रमाण जुन महिन्यापासुन खुपच कमी आहे. तसेच जमीनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपुन गेली आहेत.
नंदुरबार तालुक्यामध्ये कापूस, बाजरी, ज्वारी, मुग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात. पुरेसा पाऊस नसल्यामुळे या पिकांचे उत्पन्न येवु शकत नाही. शनिमांडळ, रनाळे, खोंडामळी सर्कलमध्ये परिस्थिती अत्यंत भयानक असुन गावकऱ्यांना पिण्याचे पाणी सुध्दा मिळत नाही. तसेच गुरांना सुध्दा जंगलात प्यायला पाणी नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नंदुरबार तालुका दुष्काळी जाहीर करावा.
निवेदन देण्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, पंचायत समितीच्या सभापती माया माळसे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, पंचायत समिती सदस्य कमलेश महाले, भालेर ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन पाटील, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर इंदानी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची पिके करपली; संभाव्य पाणीटंचाईचे गडद संकट
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या जीव भांड्यात पडलेला आहे. निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे बळीराजा नेहमी संकटात सापडत असतो.जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभ ठाकलं आहे. पिके करपलेली असून,संभाव्य पाणीटंचाईचे संकट देखील उभे राहिले आहे.शनिमांडळ, रनाळे, खोंडामळी मंडळात परिस्थिती बिकट झाली असून, ग्रामस्थांसह जनावरांना देखील पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण नंदुरबार तालुका दुष्काळ जाहीर करावा
ॲड.राम रघुवंशी
जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)