नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जुना बैल बाजार परिसरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची शाखा सुरु करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी सउद मन्सुरी तसेच उपाध्यक्षपदी सादब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा उभारुन युवकांचे संघटन उभारण्याचे काम सुरु आहे. त्याच अनुषंगाने नंदुरबार येथील जुना बैल बाजार परिसरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शाखेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, उपाध्यक्ष समिर शेख, कार्याध्यक्ष कालु पैलवान, उपाध्यक्ष लाला बागवान, नायब पैलवान, बबलू कदमबांडे, राज चौधरी, राजा ठाकरे, नाना माळी, मोसिन शेख, आदिल मन्सुरी, ईनुस शेख, जुबेर शेख, चंदू गवळी, हर्षद शेख, युनुस शेख, अश्फाक मन्सुरी, सादिक सय्यद, सोनू सिंधी, अजय पगारे, रवी बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








