नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी राजपत्रित अधिकारी महासंघ, अधिकारी कर्मचारी पेन्शनर्स संघ, सियोन युथ फाऊंडेशनच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी, शेत मजुर, उद्योजक, अधिकारी, डॉक्टर्स आदी गुणवंतांचा भव्य सत्कार समारंभ विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नंदुरबार येथील याहामोगी माता मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी युवक कल्याण व क्रिडा मंत्री पद्माकर वळवी, विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी दत्तात्रय वळवी, सेवानिवृत्त सहसचिव सदानंद गावित, जीएसटी चे उपायुक्त अजय खर्डे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी,
उपसचिव कालुसिंग वळवी, उपसचिव विजयसिंग वसावे, उपायुक्त विकास पाडवी, उप प्रादेशिक अधिकारी राजु वसावे, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त शिवलाल वळवी, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त अमृत गावित, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अरुण गावित, उपसचिव प्रकाश वळवी, डॉ राजेश वसावे, डॉ. राजेश वळवी,डॉक्टर भरत वळवी, राज्य उत्पादन शुल्काचे उप अधिक्षक यशवंत पवार, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक बटेसिंग वसावे, पोलीस उप अधिक्षक विश्वास वळवी,आयडीबीआय बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक मानाजी मावची,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे,
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी नामदेव पटले सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, सेवा निवृत्त उपविभागीय वन अधिकारी सुरेश पवार,युवा सेनेच्या राज्य सह सचिव मालती वळवी, समीरा नटावदकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी, शेत मजुर, उद्योजक, अधिकारी, डॉक्टर्स आदी गुणवंतांचा भव्य सत्कार करण्यात आला.