Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापुर तालुक्यात हत्तीरोग नियंत्रणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम सुरु

team by team
August 19, 2023
in राज्य
0
नवापुर तालुक्यात हत्तीरोग नियंत्रणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम सुरु

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात हत्तीरोगाची समस्या असल्याने तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन औषधोपचार करणार असल्याचे, जिल्हा हिवताप अधिकारी अधिकारी अपर्णा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात ही मोहिम सुरु झाली असून 26 ऑगस्ट 2023 पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे. यामध्ये घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी गोळ्या खाऊ घालणार आहेत. हत्तीरोगाच्या निर्मुलनासाठी सामुहिक औषधोपचार मोहिम आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नवापुर तालुक्यातील 2 वर्षाखालील मुले, गर्भवती स्त्रिया व गंभीर आजारी रुग्ण वगळता सर्वांना गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. शहरी व ग्रामीण भागात शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे बुथ आयोजित करण्यात येतील व सर्व कार्यालये, बँका व इतरत्र घरोघरी जाऊन गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत.

 

 

हत्तीरोग हा बुचेरेरीया बॅनक्रॉफटी या परोपजीवी जंतुमुळे होणारा आजार असुन या आजाराचा प्रसार क्युलेक्स प्रकारच्या डासांमुळे होतो. दुषित व्यक्तिच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु या डासामार्फत निरोगी व्यक्तिच्या शरीरात प्रवेश करतात. नवापुर तालुक्यातील सर्व नागरिकांना एकाच वेळी डी.ई.सी. व अलबेन्डाझॉल गोळ्या खाऊ घातल्यामुळे दुषित आणि वाहक व्यक्तिंच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु मरतात व त्यामुळे निरोगी लोकांना हत्तीरोग होण्याचा धोका टळतो. यासाठी नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र व्यक्तिने आरोग्य विभागाने दिलेल्या गोळ्या खाणे आवश्यक आहे.

 

 

आरोग्य विभागामार्फत या मोहिमेसाठीचा पुरेसा औषधसाठा, प्रशिक्षण देण्यात आले आहे. शाळांमध्ये जाऊन सदर मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येत आहे, शहर परिसरात होर्डींग, बॅनर, घंटागाडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक असल्याने 17 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये नवापुर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या हत्तीरोग सामुदायीक औषधोपचार मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन, गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, व जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आनंदाची बातमी : गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा

Next Post

जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी 23 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन

Next Post
जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी 23 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन

जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी 23 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add