नंदूरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर
येथे ७६ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हा उपक्रम घेण्यात आला.
७६ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी मेरा देश” (मेरी मिट्टी मेरा देश) उपक्रम घेण्यात आला. १५ ऑगस्ट २३ रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मागासवर्गीय कन्या छात्रालयाचे ध्वजारोहण संस्थेचे हितचिंतक शानाभाऊ धनगर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे ध्वजारोहण संस्थेचे कार्याध्यक्ष विजय भास्करराव बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय बोरसे हे होते.प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, संचालिका बेबीताई भास्करराव पाटील, सचिव भिका पाटील, संचालिका सौ. प्राजक्ता बोरसे, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील,
सरपंच सौ.शोभा बागुल, सर्व संचालक मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ संस्थेचे हितचिंतक,प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर हे उपस्थित होते. यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ, पंचप्राण शपथ घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या, तसेच हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत मनोगत व्यक्त केले.देशभक्तीपर गीते, नाटिका ,पोवाडे, नृत्य सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.