नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिवदर्शन विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस यशवंतराव पाटील होते.
यावेळी मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमांतर्गत भालेर गावातील माजी सैनिक गुलाबराव बाबुराव पाटील,श्रावण डिगंबर पाटील, देविदास श्रीराम पाटील,प्रल्हाद लोटन पाटील यांचा सत्कार करून त्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच ध्वजारोहन माजी सैनिक गुलाबराव बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पंचप्राण प्रतिज्ञा व तंबाखूमुक्त प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य आर.एच. बागुल,
पर्यवेक्षक व्ही.जे. पाटील, कृ. उ. बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हिंमतराव पाटील, तिसरीचे सरपंच दिलीप पाटील, नानाभाऊ पाटील , अशोक पाटील, गणेश पाटील, मन्सूरी सर , प्रभाकर पाटील,कन्हैयालाल पाटील , बापू पाटील,.किशोर पाटील, पंडीत भील, सखाराम भील व भालेर, नगाव , तिशी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी एरोबिक्स नृत्य व लेझीम नृत्य सादर केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी सहकार्य केले.