Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे उपस्थितीत एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प होणार पूर्ण

team by team
August 17, 2023
in राज्य
0
विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे उपस्थितीत एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प होणार पूर्ण

नंदूरबार l प्रतिनिधी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील हे 18 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा भेटीसाठी येणार आहेत. सदर भेटी दरम्यान ते शहादा येथे भेट देवून पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे उद्घाटन करणार आहेत.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ.बी.जी. शेखर पाटील यांचे हस्ते शहादा तालुक्यातील दुधखेडा धरण परिसरात वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याअनुषंगाने 5 हजार वृक्षलागवड शहादा तालुक्यातील दुधखेडा धरण परिसरात केल्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण होणार आहे. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत शाळा, महाविद्यालय, पडीक जमीनी, माळरान इत्यादी ठिकाणी लोकसहभागातून 95 हजार वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. 95 हजार वृक्ष लागवड करण्यासाठी नंदुरबार जिल्हयातील विविध शाळा, महाविद्यालय, सामाजीक संघटना व स्थानिक नागरीकांनी स्वयंपूर्तीने सहभाग नोंदवीला होता.

त्यानंतर संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांना शोधून अटक करण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमाचे उद्घाटन शहादा शहरातील जुन्या पोलीस ठाणे जवळ व्यापारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर शहादा व तळोदा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हा उघडकीस आल्याने सीसीटीव्ही मालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

शहादा तालुका व शहरातीलसर्व शाळा / महाविद्यलयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना व नागरिकांनी, दुधखेडा येथील धरण परिसरात वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा उद्या होणार अंमली पदार्थ मुक्त घोषीत

Next Post

भाजपातर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

Next Post
भाजपातर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

भाजपातर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add