Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरात बालमृत्यु झाल्यास परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
August 11, 2023
in राजकीय
0
घरात बालमृत्यु झाल्यास परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार । प्रतिनिधी

 

 

जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज दिले आहेत.

 

 

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक जिल्हा परिषदेमध्ये संप्पन झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्य अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवी डॉ कांतीलाल टाटीया, लतिका राजपुत, चेतन साळवे ,तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 

 

ते पुढे म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी दुर्गम भागात नियमित जात नसल्याने कुपोषित बालक, गरोदर मातांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. ते वेळेवर दवाखान्यात पोहचू शकत नाही. जर आरोग्य यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी वेळेवर पोहचले तर कुपोषित बालके आणि गरोदर महिलांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच उपचारासाठी देखील तात्काळ रुग्णालयात दाखल करता येईल, असे मत यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केले.

 

 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाड्या-पाड्यापर्यंत आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काही महिन्यात बारमाही रस्त्यांची बांधणी देखील केली जात आहे. तर दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्युतीकरणाच प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. गरज भासल्यास गुजरात, मध्यप्रदेश सरकारच्या सामंजस्यआने अतिदुर्गम भागात विद्युत पुरवठा करुन हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल,असेही यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले.

 

वैद्यकीय महाविद्यालयास डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात एक वार ठरवुन त्यांच्या मार्फत देखील आरोग्य सुविधा पुरविण्याचा मानस यावेळी त्यांन व्यक्त केला. यावेळी आरोग्याशी संबंधीत सर्व समस्या त्यांनी यंत्रणेकडून जाणून घेत राज्य तसेच जिल्हा स्तरावर याचे लवकरच निराकरण करुन दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे देखील बळकटीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 

 

ते म्हणाले, रस्त्यांची निर्मीती होईपर्यंत बांबुची झोळी करुन रुग्णांना दवाखान्या पर्यंत नेणाऱ्यांना काही अनुदान किंवा मानधन देका येईल का व तालुका स्तरावर शववाहीक बाबत शासन स्तरावरुन तात्काळ निर्णय घेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र आरोग्य यंत्रणेने सजग राहून जिल्ह्यातील आरोग्य समस्या मार्गी लावण्याची गरज मंत्री डॉ गावितांनी यावेळी बोलताना आवर्जून अधोरेखित केली.

 

 

यावेळी झालेल्या चर्चेत, जिल्हा परिषदेच्य अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवी डॉ कांतीलाल टाटीया, लतिका राजपुत, चेतन साळवे यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

Next Post

14 ऑगस्ट रोजी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आक्षरण सोडत

Next Post
14 ऑगस्ट रोजी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आक्षरण सोडत

14 ऑगस्ट रोजी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आक्षरण सोडत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add