नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी .एस पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि..प.चे माजी सदस्य विश्वनाथ वळवी ,शेजवा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच मुन्ना वसावे , पोलीस पाटील योगेश वसावे, मा. पोलिस पाटील मानसिंग वसावे हे होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते कुलदैवत यहा मोगी माता यांचे पूजन करून आदिवासी समाजाला, आपल्या भारत देशाला आपलं जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी तंट्या भिल ,खाजा नाईक, बिरसा मुंडा, उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी यांनी केले. तर सूत्रसंचालन शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार यांनी केले .आभार शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे उपशिक्षक रामानंद बागले, हारून खा शिकलीगर , संजय बोरसे, उपशिक्षिका संगीता गोखले , लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे, दिनेश पवार यादींनी परिश्रम घेतले यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी पेहराव केला होता. सदरील कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









