Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वावद येथे मद्याची वाहतूक करणारे वाहन उलटले

team by team
September 29, 2021
in क्राईम
0
वावद येथे मद्याची वाहतूक करणारे वाहन उलटले

नंदुरबार  l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील वावद जवळ धुळे येथील एमआयडीसीमधून मद्य घेवून नंदुरबारकडे येत असणाऱ्या पिकअप व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटल्याने  वाहन उलटून अपघात घडला. यावेळी अनेकांनी संधी साधत काही मद्याचे खोके पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तालुका पोलिसांना याप्रकरणी समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धुळे येथील एमआयडीसीमधून काल मद्याची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन नंदुरबारकडे येत होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील वावदजवळील वळणावर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटून अपघात घडला. मद्य घेवून जाणारे वाहन उलटल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संधी साधत अनेकांनी मद्याचे खोके पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोहेकॉ.नाईक हे घटनास्थळापासून काही अंतरावर असल्याने तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेत वरिष्ठांशी संपर्क साधला. यामुळे मद्य पळवून नेण्याच्या बेतात असणाऱ्या अनेकांचा हिरमोड होत त्यांना केवळ घटनास्थळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. दरम्यान, नंदुरबार तालुका पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार यांच्यासह तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व रनाळे पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनास्थळी जावून भेट दिली. तात्काळ सदरचा मद्यसाठा दुसऱ्या वाहनात नेण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेकांनी संधी साधत मद्य पळवून नेले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात कार्यवाही सुरु होती.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा कल्चरल अकॅडमीच्या अध्यक्षपदी राजेेश रघुवंशी तर सचिवपदी प्रा.मोरावकर

Next Post

नंदुरबार तालुक्यात पुन्हा सापडले दोन कोरोना रुग्ण, जिल्ह्यात कोरोनाचे ८ ॲक्टीव रूग्ण

Next Post

नंदुरबार तालुक्यात पुन्हा सापडले दोन कोरोना रुग्ण, जिल्ह्यात कोरोनाचे ८ ॲक्टीव रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add