नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तहसिल परिसरात जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे तहसिल कार्यालयात कामानिमित्त येणार्या नागरीकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांची त्वरीत व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा माहिती अधिकार महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मागील काळात नंदुरबार तहसील कार्यालयामार्फत वाळू माफिया, नियम न पाळणारे अधिकृत परवाना धारकांवर व ओव्हरलोड ट्रक, डम्पर, ट्रैक्टर, असे अवजड वाहनांना जप्त करून कठोर कारवाई करण्यात आली होती. मात्र आज तगायत चलान न भरलेल्या वाळू माफियांची व इतर लोकांची वाहने नंदुरबार तहसीलमध्ये सर्व मैदान अडवून उभी असल्याने तेथे शासकीय कामानिमित्त येणार्या नागरिकांना खुप अडथड़ा निर्माण होत आहे. याची दखल घेऊन नंदुरबार जिल्हा माहिती अधिकार महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांच्या नेतूत्वाखाली तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन अडथळा निर्माण करणार्या वाहनांची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जयेश बागुल, उपाध्यक्ष प्रफुल सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष सईद कुरेशी, संपर्क प्रमुख जितेंद्र भोई, प्रचार प्रमुख विशाल महाजन आदी उपस्तीत होते.








