नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुका राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अक्कलकुवा येथे अतिक्रमण धारकांवर कारवाईसाठी अक्कलकुवा येथे रास्ता रोको व थाळी नाद आंदोलन करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील पिमटी येथील गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर गावकऱ्यांच्या येण्या जाण्यासाठी रस्ता कायम स्वरुपी बंद करण्यात आला आहे तेथील आदिवासी बांधव है दैनंदिन व आरोग्य,शिक्षण सुविधा पासून वंचित राहात आहेत.त्यामुळे तेथील नागरिक अनेक वर्षांपासून या समस्यांना सामोरे जात आहेत म्हणून आज अक्कलकुवा येथे पंचायत समिती समोर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप,धडगाव तालुकाध्यक्ष राहुल पावरा यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको थाळी नांद आंदोलन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलन करणारे पदाधिकारी व गावकरी यांना दोन दिवसात सदर संबंधित अतिक्रमण धारक याचा कारवाही करणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष निलेश पाडवी, बाळासाहेब मोरे,करिम बलोच,युवक धडगाव शहराध्यक्ष सचिन पावरा, युवक नंंदुबार शहराध्यक्ष,मिलिंन जाधव, हंसराज पाटील आदी नागरिक उपस्थित होते.