नंदुरबार l प्रतिनिधी
येथील हजरत इमाम बादशाह उरूसमध्ये येणार्या भाविकांना बागवान गल्ली येथे आईस्क्रीम वाटप करण्यात आले.
दरवर्षी मोहरम निमित्त नंदुरबार येथील हजरत इमाम बादशाह दर्ग्यावर उरुस भरत असतो.
यावेळी गुजरात, मध्यप्रदेशसह खानदेशातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. याचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हजरत इमारत बादशाह उरुसमध्ये आलेल्या भाविकांसाठी बागवान गल्लीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे भाविकांसाठी आईस्क्रीम वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ दिलिपराव मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, शहर कार्याध्यक्ष कालू पैलवान, शहर उपाध्यक्ष लाला बागवान तसेच युवक कार्यकर्ते उपस्थित होते.