नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त येथील सेंट मदर तेरेसा स्कूल आणि ज्यु कॉलेज येथे अजितोस्तव साजरा करण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले.
यावेळी तालुक्यातील शनिमांडळ, रनाळे, नंदुरबार येथील जिजामाता कॉलेज, फार्मसी कॉलेज येथे वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्हा ज्युदो संघटनेच्यावतीने सेल्फ डिफेन्सचे कला कौशल्य शिकविण्यात आले. यावेळी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या हस्ते बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम, द्वितीय तृतीय अशी रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मुलींवर होणार्या अत्याचारांविषयी व दैनंदिन जीवनात घडणार्या वाईट घटनेविषयी नेहमी जागृत राहावे याबद्दल मागदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी व सभासदांनी मिळून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री ऍलेक्स, क्रीडा शिक्षक संतोष मराठे, गणेश मराठे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विता वसावे यांनी केले.