नंदुरबार l प्रतिनिधी
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बुलंद आवाज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (अजित पवार गट) च्या शहरातील विविध शाखांतर्फे शहरातील विविध धार्मिक स्थळी फळवर्गीय वृक्षारोपण करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाअध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ दिलीपराव मोरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शाखांतर्फे नंदुरबार शहरातील वाघेस्वारी माता मंदिर, यहा मोगी माता मंदिर, इमाम बादशहा दर्गा अश्या विविध धार्मिकस्थळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे ह्यांच्या हस्ते आज फळवर्गीय वृक्ष लागवड करण्यात आले.
त्यात आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ, जांबुळ, लिबू अश्या वृक्षांचा समावेश होता. देसाई पुरा भिलाटी, गिरीविहार गेट, एकता नगर या ठिकाणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा उभारुन युवकांचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरु आहे. या शाखा आता सक्रीय झाल्या असून विविध उपक्रमात आपला सहभाग नोंदवित आहे. वृक्षारोपण प्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष लाला बागवान, युवक संगटक जितू पाडवी, शहर कार्याध्यक्ष कालू शाह, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबाडे, विध्यार्थी शहराध्यक्ष जयेश मोरे, रविंद्र चव्हाण, सागर कोळी, अमन पाडवी, राहुल वळवी, नदीम बागवान, राजा ठाकरे, समीर शेख आदी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.