नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. एक ऑगस्ट ते 31 जुलै असे महसुली वर्ष असून 31 जुलै पर्यंत सर्व तलाठी यांच्या दप्तराची जमाबंदी पूर्ण करून 1 ऑगस्ट पासून नवीन दप्तराची सुरुवात करतात, म्हणून 1 ऑगस्ट रोजी महसुली दिन साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीन गर्जे होते.तसेच परिक्षाविधीन तहसिलदार राहूल मोरे, निवडणूक नायब तहसीलदार रिनेश गावित, महसूल नाबय तहसिलदार राजेश अमृतकर, नायब तहसिलदार नितीन पाटील, निवासी नायब तहसिलदार बी.ओ.बोरसे, पुरवठा निरीक्षण अधिकारी रमेश वळवी उपस्थित होते.यावेळी मंडळाचे मंडळ अधिकारी प्रदीप खंडारे, रोहयो अ.का. स्वाती चव्हाण, तलाठी धनश्री गीते, पोलीस पाटील दीपमाला पाटील,
रनाळा कोतवाल हर्षल सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सन 22-23 या महसुली वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या चौपाळेचे कोतवाल निलेश शंकर ठाकरे, कंढरेचे पोलीस पाटील जयेश दिलीप पाटील, बामडोदचे पोलीस पाटील राजेश आनंदा पाटील, लिपिक ज्ञानेश्वर हेगडे, तलाठी महेश गावीत, कोरीटचे तलाठी जयेश राऊळ, अवल कारकून रविंद्र घोडके, संगायो अव्वल कारकून प्रिती पाटील, मंडळ अधिकारी झेङएम.पठाण, खोंडामळीचे मंडळ अधिकारी अनिल दौलत पानपाटील, नायब तहसीलदार रिनेश गावित, नितीन पाटील, राजेश अमृतकर, बी ओ बोरसे, पुरवठा निरीक्षण अधिकारी रमेश वळवी यांचा तहसिलदार नितीन गर्जे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.सुत्रसंचलन रिनेश गावित यांनी तर आभार राजेश अमृतकर यांनी मानले.