Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : ताराचंद कसबे

team by team
August 2, 2023
in Uncategorized
0
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : ताराचंद कसबे

नंदुरबार l प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी वर्ष 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी लाभार्थींना थेट कर्ज योजनेत लाभ 15 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना या योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

योजनेचे स्वरुप प्रकल्प
या योजनेत प्रकल्प मुल्य रूपये एक लाख असून महामंडळाचा सहभाग 85 टक्के (85 हजार) तर अर्जदाराचा सहभाग 5 टक्के (5 हजार ) राहील. यासाठी व्याज दर 4 टक्के असून परतफेडीचा कालावधी 3 वर्ष इतका राहील.

पात्रतेचे निकष

अर्जदार हा मातंग समाज व तत्स्मम 12 पोटजातीतील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षपेक्षा जास्त नसावे. अर्जदार या जिल्ह्याचा रहिवासी असावा, त्याचे सबिल क्रेडीट स्कोअर 500 असावे. अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान, अनुभव व प्रशिक्षित असावा.  अर्जदारास महामंडळाच्या नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. या योजनेत साधारणपणे पुरुष व महिला 50 टक्के आरक्षण राहील तसेच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कृत व्यक्ती, सैन्यदलातील वीरगती प्राप्त झालेल्यांच्या वारसातील एका सदस्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदारास कर्जमंजुरी व वितरणापूर्वी त्याच्या वारसदाराचे बंधपत्र द्यावे लागेल. अर्जदाराकडून कर्जमंजुरी नंतर कर्ज वितरणापूर्वी 2 जामिनदार आवश्यक असून एक नोकरदार आवश्यक असून त्याच्या विभागातील कार्यालय प्रमुखाचे वसुलीसाठी हमीपत्र घेण्यात येईल, तर दुसरा मालमत्ता धारक जामीनदाराच्या मालमत्तेवर महामंडळाच्या कर्जाचा बोजा नोंद करुन देणे आवश्यक आहे. अर्जदारास कर्ज मंजुर, वितरणापूर्वी कर्ज वसुली पोटी उत्तर दिनांकीत धनादेश देणे बंधनकारक राहील. अर्जदाराने मंजुर कर्जाचा पहिला हप्ता वितरीत केल्यानंतर व्यावसायाचा विमा महामंडळ व लाभार्थी यांचे संयुक्त नावे करणे बंधनकारक राहील. व दर वर्षी विम्याचे नुतनीकरण करणेसाठी होणारा खर्च लाभार्थीने स्वत: करावा. कर्ज वितरण झाल्यापासून तीन महिन्यानंतर कर्जाची वसुली (मुद्दल व व्याज) याप्रमाणे करावी. महामंडळात कर्ज वसुली दरमाह भरावी.

कर्ज योजनेचे अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट, 2023 ते 30 सप्टेंबर, 2023 आहे. हे अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सांय. 6.15 पर्यंत स्विकारले जातील. प्राप्त कर्जप्रकरणांची छाननी, तपासणी शासन निर्णयानुसार करण्यात येऊन लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये संबधित अर्ज ठेवण्यात येतील. लाभार्थी समितीमध्ये मंजुर झालेल्या पात्र लाभार्थीचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीस पाठविण्यात येतील. त्याचप्रमाणे जिल्हा कार्यालयास दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा जास्त कर्जप्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड शासन आदेशानुसार लॉटरी पद्धतीने समितीमार्फत करण्यात येईल.

मांतग समाजातील होतकरु महिला, पुरुष, प्रशिक्षित लाभार्थीनीं या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. नंदुरबार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलावरोड नंदुरबार येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. कसबे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सामाजिक कार्य वाखानन्याजोगे : मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post

रनाळे येथे रास्तारोको केल्या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
विद्यार्थी व पालकांनी केला रास्तारोको

रनाळे येथे रास्तारोको केल्या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add