Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सामाजिक कार्य वाखानन्याजोगे : मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
August 2, 2023
in राजकीय
0
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सामाजिक कार्य वाखानन्याजोगे : मा.आ.चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा प्रत्येक उपक्रम हा स्तुस्त असतो. त्यांचे सामाजिक कार्य हे वाखानन्याजोगे आहे, असे प्रतिपादन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सहाव्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमास रोटरी ३०६० डिस्ट्रिक्ट गव्हर्नर निहीर दवे, माजी आमदार शिरीष चौधरी, पीडीजी आशिष अजमेरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, फर्स्ट लेडी वैशाली दवे, क्लस्टर सेक्रेटरी डॉ.राणू अजमेरा, किरण तडवी, उद्योजक उमेश जैन, असिस्टंट गव्हर्नर चेतन सिसोदिया, व्हॉइस ऑफ नंदुरबारचे परीक्षक नाना पवार, चंद्रशेखर चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी रोटरीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक कार्य करण्याचा मानस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर निहीर दवे यांनी व्यक्त केला. पदग्रहण समारंभात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्षपदी फखरुद्दीन जलगुणवाला तर सचिवपदी आकाश जैन यांनी पदग्रहण केले. रोटरी नंदनगरीच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ नंदनगरी चे विशेष सभासदत्व स्वीकारले. त्यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे, कुणाल शेलके, प्रफुल भावसार, अंकित जैन, उमेश जैन, इंजि.हेमंत पाटील, किरण तडवी, आर्किटेक्ट नीरज देशपांडे यांनी सभासत्व स्वीकारले. रोटरी नंदनगरीच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच रोटरी नंदनगरीतर्फे आनंदग्राम या प्रकल्प अंतर्गत फुलसरा हे गाव दत्तक घेण्यात आले असून तिथे वृक्षारोपण करण्यात आले. चौपाळे येथील अरिहंत गोशाळेत गोपूजन करण्यात आले. गरजूंना विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच रस्त्यावर बसून विक्री करणार्‍या गरजू दुकानदारांना छायडो या प्रकल्पांतर्गत नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते मोठ्या छत्रींचे वाटप करण्यात आले. मतिमंद शाळेत फळ वाटप करण्यात आले,
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांच्या कुटुंबाला बालकवच या उपक्रमातर्गत किट देण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील नवोदित गायक कलावंतांसाठी व्हॉइस ऑफ नंदुरबार या कराओके गीत गायन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. व्हॉइस ऑफ नंदुरबार ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोठ्या गटात ४० तर लहान गटात १० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण नाना पवार व चंद्रशेखर चव्हाण यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावर्षी व्हाईस ऑफ नंदुरबारची मानकरी अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील प्रज्ञा खुशाल जाधव ही ठरली. या स्पर्धेत व्हॉइस ऑफ नंदुरबार ठरलेल्या प्रज्ञा जाधव हिस इंदूर येथे होणार्‍या रोटरी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये सिनेगायक शंकर महादेवन यांच्यासोबत गाण्याची संधी देण्यात येईल, असे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर निहीर दवे यांनी घोषित केले.
या कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते नागसेन पेंढारकर, बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड प्राप्त झालेले किरण दाभाडे व नंदुरबार मार्केट कमिटीच्या नूतन संचालकपदी निवड झालेले गिरीश जैन यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नूतन अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. माजी अध्यक्ष अनिल शर्मा यांनी मागील वर्षाचा आढावा मांडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशंसा तंवर हिने गणेशवंदना नृत्य सादर केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले तर आभार नागसेन पेंढारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज पाटील, रमाकांत पाटील, सय्यद इसरार अली, हर्षल पाटील, प्रवीण पाटील, विजय बडगुजर, राहुल पाटील, प्रा.राहुल मेघे, राजनसिंग चंदेल, ऍड.सुशील गवळी, विकास तोष्णीवाल, प्रितिश बांगड, राकेश आव्हाड, इद्रिस वोरा, जितेंद्र सोनार, युनूस सय्यद, मुर्तूझा वोरा, प्रितेश सोनार, अब्बास काटावाला, जुझर बोहरी, विवेक जैन, अली मर्चंट, प्रवीण येवले, पंकज मराठे, निलेश तंवर, डॉ.विशाल चौधरी, शब्बीर मेमन, ऍड.प्रेमानंद इंद्रजित आदींनी परिश्रम घेतले.
रोटरी क्लब ऑफ नंदनगरी आयोजित व्हॉइस ऑफ नंदुरबारचे विजेते
मोठा गट
प्रथम – प्रज्ञा खुशाल जाधव,
द्वितीय – मनोज खैरनार,
तृतीय – दीप्ती कैलास शिवदे,
उत्तेजनार्थ कोमल पवार-ढोढरेख उत्तेजनार्थ संदीप सुदाम भोई
लहान गट
प्रथम-अर्णव विजय बोढरे
द्वितीय – आरव सुनील निकुंभे
तृतीय – मनस्वी चंद्रकांत ईशी
उत्तेजनार्थ – रुद्राणी अनिल ठाकरे
बातमी शेअर करा
Previous Post

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी ७ ऑगस्टला तूरवाद्य आंदोलन

Next Post

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : ताराचंद कसबे

Next Post
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : ताराचंद कसबे

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : ताराचंद कसबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add