नंदुरबार l प्रतिनिधी
प्रहार शिक्षक संघटना नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना वारंवार निवेदने दिली. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी थोडा कालावधी वाढवून मागत पुढे आंदोलन करण्यास पुरता स्थगिती पत्र दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक वर्षापासुन विविध मागणी जि. प. नंदुरबार यांच्याकडे अनेक वेळा निवेदन देऊन ही दखल घेतली जात नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी विविध प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने दि. ७ ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी पारंपारिक तुरवाद्य वाजवून जि.प. नंदुरबार येथे आंदोलन करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, विभागीय नाशिक कार्यालय, नाशिक, बच्चु कडु सो. महाराष्ट्र राज्य मुंबई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, पोलीस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन, नंदुरबार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी जि.प. नंदुरबार, राज्याध्यक्ष विकास घुगे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
दरमहा वेतन १ ते १० तारखेपर्यंत करणे, सीएमपी प्रणाली लागु करणे, बोगस प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षकांची तपासणी जे.जे. रुग्णालय मुंबई येथे करणे, शिक्षण अधिकारी यांनी संघटनेचे दिशाभूल करत जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे तपासणीसाठी शिबिर आयोजित केलेले आहे. दिव्यांग शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केलेली आहे. मा. राज्यपाल यांच्या शासननिर्णयाचे उल्लंघन करत उच्च न्यायालय औरंगाबाद हायकोर्ट चा अवमान, पेसा’ अंतर्गत बोलीभाषेनुसार पदस्थापना न देणेबाबत, मागील दोन वर्षापासून प्रलंबीत गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत मिळणे, मेडिकल बीले मंजूरही होऊन अद्याप पर्यत रक्कम मिळत नसल्याबाबत. वैदयकिय सुविधासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करुन द्यावी, तालुकास्तरावर सेवापुस्तक नोंदी शिबीर लावणे, शहादा तालुक्यातील २१ शिक्षणसेवकांची नियमित वेतन फरक मिळणे,
तळोदा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा २ रा हप्ता सातवा वेतनाच्या हफ्त्यांसाठी तात्काळ तरतूद करावी. भविष्य निर्वाह नीधी सन २०२१-२२, २०२२-२३ स्लीपा मिळणेबाबत. चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करणे. १ वर्षापासुन प्रस्ताव पेंडिंग आहे. केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ आदेश रद्द करणे. स्थायित्व आदेश मिळणेबाबत, जि.प. स्कूल वैजाली ता. शहादा येथील प्राथमिक जि.प. शाळा आदेश निर्लेखन होऊनही प्रलंबित आहे.
शिक्षक प्रश्नी प्रशासन संवेदनशील राहिले नाही अशी संघटनेची धारणा असल्याने व संघटनेला दिलेल्या लेखी पत्राचा शिक्षणाधिकारी यांना विसर पडल्याने तुर्तास स्थगित केलेले आमरण उपोषण आंदोलन जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उष्माघाताच्या अनुषंगाने आंदोलन स्थगित करण्यात आलेले होते. यावरही प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने जिल्हा परिषद नंदुरबार येथील गेट समोर प्रहार शिक्षक संघटनेचे तुरवाद्य आंदोलन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी निवेदनात नमूद केले आहे.