नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर ता.नंदुरबार येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व कीर्तन सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. येथे अधिक मासानिमित्त महादेव चौकात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व किर्तन सप्ताहाचे आयोजन अधिक श्रावण शुद्ध पंचमी २३-७-२३ ते अधिक श्रावण शुद्ध बारस ३०-७-२३ करण्यात आले होते.

३० जुलै रोजी ह.भ .प .मुरलीधर महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामस्था तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व कीर्तन सप्ताहात ह .भ. प .गोकुळ महाराज शेळगावकर, ह .भ .प .नारायण महाराज भडनेकर, ह .भ. प. मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, ह. भ. प. दत्ता महाराज देवळीकर,ह.भ.प. प्रतिभाताई सोनगीरकर ,ह. भ. प. मंदार शास्त्री नाशिककर, ह. भ. प. मुरलीधर महाराज कंढरेकर, ज्ञानेश्वर पारायणाचे नेतृत्व भीलाबापू खोरीकर यांनी केले.
गायक म्हणून भगवान महाराज, हार्मोनियम वादक धर्मराज महाराज, पखवादक पुंडलिक महाराज, विणेकरी दिगंबर महाराज, हरिपाठ श्रावण महाराज यांनी या सप्ताहात सेवा दिली. या सप्ताहात परिसरातील भालेर तीसी, नगाव, शिंदगव्हाण, काकरदे, विखरण ,खोंडामली, नाशिंदे, जूनमोहिदे, कलमाडी निंभेल, कंढरे सह अनेक गावातील भजनी मंडळींनी सहभाग घेतला कार्यक्रमात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व किर्तन सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ तर्फे करण्यात आले होते.








