नंदुरबार l प्रतिनिधी –
नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या तालुक्यात कोपर्ली गटाचे शिवसेनेचे उमेदवार ॲड . राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कोपर्ली गटातील शिवसेनेचे उमेदवार ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार ॲड.राहुल श्रीराम कुवर यांनी हरकत घेतली होती . ॲड.राम रघुवंशी यांच्या अर्जात दाखविलेल्या मालमत्तेवर हरकत कुवर यांनी घेतlI होती. याचिकेवर नंदुरबार जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली . यावेळी ॲड.राम रघुवंशी यांच्याकडुन ॲड. बंडू जोशी , सरकारी पक्षाकारातर्फे ॲड. विजय चव्हाण तर ॲड.कुवर हे स्वतः वकील असल्याने त्यांनी स्वतः युक्तीवाद केला . आज मंगळवारी जिल्हा न्यायालयात कामकाज होऊन हरकत फेटाळण्यात आली आहे .
कोपर्ली या गटात ७ इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत . 29 रोजी माघारी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या गटाकडे लागून आहे .