नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सावन कुमार यांनी काल पदभार स्वीकारला असून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी त्यांच्याकडे जिल्हा परिषदेची सुत्रे सोपविली त्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट घेतली.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची परभणी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर सावन कुमार यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सावन कुमार यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. काल दि. २४ रोजी त्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतली आहे. दरम्यान, त्यांना अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी जिल्हा परिषदेची सुत्रे सोपविली पदभार घेतल्यानंतर त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला.








