नंदूरबार l प्रतिनिधी
बंजारा समाजाच्या पदोन्नती सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांना गुणगौरव कार्यक्रम वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने नंदुरबार येथील व्ही.जे.राजपूत लॉन्स येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकुवाचे तहसीलदार रामजी मानसिंग राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्राळे येथील काठोबा देव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास राठोड तर उद्घाटक म्हणून भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल पवार, नंदुरबार पंचायत समिती सदस्य प्रल्हाद राठोड, पंचायत समिती सदस्य तेजमल पवार, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती धडगाव छोटू राठोड आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील गुणवंत दहावी बारावी डिप्लोमा डिग्री पदविका ग्रॅज्युएशन गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन स सत्कार करून गौरविण्यात आले.पदोन्नती, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारीं यांना सन्मान चिन्ह, शाल ,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
समाज हा शिक्षण घेऊनच मोठा झालेला आहे म्हणून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा व मोठे व्हा असे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष करणसिंग चव्हाण ,जिल्हा सचिव मोरसिंग राठोड , जिल्हा कार्याध्यक्ष आतीष चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष राजूसिंग पवार, उपाध्यक्ष नानू राठोड, सुपडू राठोड सहसचिव प्रमोद जाधव, अनिल राठोड सल्लागार छोटू राठोड, रामजी राठोड, विजय जाधव, प्रा.डी.डी.राठोड, प्रसिद्धीप्रमुख गुलाब राठोड, कैलास पवार, मगन राठोड, महिला आघाडी प्रमुख छाया पवार, संघटक प्रा.संजय जाधव, धारासिंग राठोड आदि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणसिंग चव्हाण, मोरसिंग राठोड यांनी केले.तर आभार ज्ञानेश्वर राठोड यांनी मानले.

यावेळी कार्यक्रमात श्रावण उखा चव्हाण यांना
समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 10 वी पास 85 टक्केच्यावर 45 विद्यार्थी, 12 वी पास 80 टक्क्याच्या वर 7 विद्यार्थी, पदोन्नति मिळालेले 26 कर्मचारी, सेवा निवृत्त 14 कर्मचारी, पदविका डिग्री 17, तर विविध क्षेत्रातील श्रावण चव्हाण, रामजी राठोड, छोटू राठोड, आतीष चव्हाण, चरणसिंग चव्हाण, अमरसिंग चव्हाण, भावेश पवार, विक्रम चव्हाण या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.








